अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची जळगाव तहसीलदारांच्या वाहनाला धडक


A tractor transporting illegal sand hit the vehicle of Jalgaon Tehsildar जळगाव (29 नोव्हेंबर 2024) : अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंग करणार्‍या तहसीलदार यांच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. या गाडीत पथकातील कोणालाही दुखापत झाली नाही मात्र शासकीय कारवाईलाच थेट वाळू व्यावसायिकांनी आव्हाण दिल्याचे बोलले जात आहे. ही घटना निमखेडी शिवारात गुरुवारी पहाटे घडली. याप्रकरणी संध्याकाळी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

वाळूची चोरटी वाहतूक कायम
गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. अवैधरिच्या वाळूच्या वाहनाविरोधात कारवाई करण्यासाठी गुरुवारी पहाटे महसूल कर्मचार्‍यांचे पथक पहाटे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करण्यास निघाले. समोरुन वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसताच पथकाने त्याला रोखले. बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्याने हे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात पथक नेत होते.

दरम्यान या कारवाई टाळण्याच्या अनुषंगाने चालकाने तहसिलदार यांच्या शासकीय वाहनाला ट्रॅक्टरची धडक दिली. ही जीप उलटण्यात थोडक्यात बचावली. या घटनेत कोणाही कर्मचार्‍याला दुखापत झाली नाही.
या प्रकरणी संध्याकाळी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यत सुरू होती. वाळू व्यावसायिकांची मग्रुरी या घटनेतून समोर आली असून प्रशासनासमोरही आव्हाण उभे राहिले आहे.


कॉपी करू नका.