आमदार असावा तर असा ! : बक्षीपूरसह पालसाठी तत्काळ पाच एमव्हीएचा ट्रान्सफार्मर मंजूर


रावेर (2 डिसेंबर 2024) : बक्षीपूरसह पाल परिसरातील वीजपुरवठा समस्या सोडवण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. मुख्य अभियंता मुलानी यांच्याशी चर्चा करून बक्षीपूर आणि पाल उपकेंद्रांमध्ये पाच एमव्हीएम क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या प्रकल्पासाठी चार महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली.

कमी-अधिक दाबाची वीज समस्या सुटणार
या भागातील शेतकर्‍यांना कमी दाबाने वीजपुरवठा, अपूर्ण वीजपुरवठा, लो व्होल्टेज आणि कर्मचारी टंचाई यासारख्या समस्या जाणवत होत्या. यावर उपाय म्हणून दोन वायरमन नियुक्त करण्यात आले तर लो व्होल्टेज समस्येवर उपाय म्हणून पुढील 2-3 दिवसांत सर्व ठिकाणी कॅपेसीटर बसवण्याचा निर्णय झाल्याने वीजपुरवठा अधिक स्थिर व गुणवत्तापूर्ण होईल.

यांची होती उपस्थिती
बैठकीला अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील, उपकार्यकारी अभियंता मराठे, भाजपाचे पदाधिकारी सुरेश धनके, सी.एस.पाटील, पी.के.महाजन यांच्यासह परिसरातील सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते. बक्षीपूर, पाल, खिरोदा प्र.रा., रसलपूर, जीन्सी व परिसरातील नागरिकांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. शेती व अन्य उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


कॉपी करू नका.