राष्ट्रवादीला धक्का देत प्राजक्त तनपुरे अखेर भाजपात

निर्णय कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचा दावा


मुंबई (30 मे 2026) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी शनिवार, 30 रोजी अखेर भाजपात प्रवेश केला भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत त्यांनी हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचे यावेळी सांगितले.

पक्ष मजबुतीसाठी काम करणार
प्राजक्त तनपुरे यांनी पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पक्षप्रवेशानंतर तनपुरे तत्काळ पक्षाच्या कामाला लागले असून . आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचीदेखील उपस्थिती होती.

विकासकामांची अपेक्षा
पक्षप्रवेशानंतर बोलताना तनपुरे म्हणाले, आज राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे आमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले, माझा मतदारसंघ प्रामुख्याने ग्रामीण भागाचा आहे. तिथे शेती, वीज आणि पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांच्या सोडवणुकीला अधिक चालना मिळेल, अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

पक्षाकडून भविष्यात जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वासही तनपुरे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने आमचे स्वागत केले आहे. यापुढे पक्ष जी भूमिका आणि जबाबदारी देईल, ती आम्ही पूर्ण क्षमतेने पार पाडू, असे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !