विरावली रस्त्यावर शेत-शिवारात गोवंशचे मांस आणि गोवंश पोलिसांनी पकडले
The police seized beef and cattle in the fields along the Viravali road. यावल (30 मे 2026) : शहरातून विरावलीकडे जाणार्या रस्त्यावर विरावली शेत-शिवारात शेत गट क्रमांक 287 अ मध्ये एका शेडच्या आत गोवंश कत्तल करून त्याचे तुकडे करतांना तसेच एक कत्तलीसाठी बांधून ठेवलेले जिवंत गोवंश पोलिसांना मिळून आले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी शुक्रवारी जप्त केला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
विरावली, ता.यावल या गावाच्या शिवारात यावल विरावली रोडवर शेत गट क्रमांक 287 अ आहे. रियाज खान (काजीपुरा, यावल) यांच्या मालकीच्या शेतात एका शेडमध्ये शुक्रवारी गोवंश कत्तल करून त्याचे तुकडे केले जात होते व दुसरे एक गोवंश तेथे कत्तलीकरीता बांधुन ठेवले होते. याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली व त्यांनी पथकासह तेथे छापा टाकला व 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार उज्वल पाटील यांच्या फिर्यादीवरून शेत मालक रियाज खान सह अरबाज खान (रा. खिर्णीपुरा यावल), जावेद खान कुरेशी (रा. डांगपुरा, कुरेशी वाडा) आणि एक अनोळखी व्यक्ती चार जणाविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.
