पारोळ्यानजीक दोन कारमध्ये भीषण अपघात : सुरतचे दाम्पत्य जागीच ठार


Terrible accident involving two cars near Parola : Surat couple dies on the spot पारोळा (3 डिसेंबर 2024) : दोन भरधाव कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुरतच्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. सुधीर देवीदास पाटील (48), पत्नी ज्योती सुधीर पाटील (44, दोन्ही रा.लोणी, ता.पारोळा, ह.मु.गुजरात, राज्य) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. पारोळा तालुक्यात म्हसवे फाट्याजवळ हा अपघात घडला असून अपघातातील जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणी गावी जाणार्‍या दाम्पत्यावर काळाचा घाला
पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे 4 डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. सोमवार, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे 05 आरएच 1247) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाटील हे कार वळवत असतांना जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी 03 के 6903) ने जोरदार धडक दिली.

अपघातात दाम्पत्य ठार, कारचा चुराडा
या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला तर नाशिक येथील शिरीष लठ्ठा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले. त्यांना पारोळाच्या कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !