सुवर्ण व्यावसायीकाचे दोन कोटी 13 लाखांचे सोने लांबवले : दोघांना गुन्हे शाखेकडून अटक


Gold trader’s gold worth Rs 2.13 crores stolen: Two arrested by Crime Branch बीड (3 डिसेंबर 2024) : मुंबईतील सुवर्ण व्यापारी रमेश जैन हे नांदेडला आल्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असताना नेकनूर जवळील रविंद्र ढाब्यावर ट्रॅव्हल्स थांबल्यानंतर चोरट्यांनी संधी दोन कोटी 13 लाख रुपये किंमत असलेले पावणेतीन किलो सोने लंपास केले होते. बीड गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याची उकल करीत 15 जणांची टोळी निष्पन्न केली व दोघांना बेड्या ठोकल्या.

व्यापारी जेवणास जाताच साधली संधी
ट्रॅव्हल्स ढाब्यावर थांबल्यानंतर व्यापारी रमेश जैन हे जेवणासाठी उतरले व चोरट्यांनी संधी साधली. ही घटना 6 ऑक्टोबर 2024 रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा तपास करत होती. पीएसआय श्रीराम खटावकर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी रमेश बाळू डिकोळे (27) आणि बाळू धर्मा डिकोळे (55, लवूळ, ता.माढा जि. सोलापूर) या दोघांना शिताफिने अटक केली. चौकशी त्यांची 15 जणांची टोळी समोर आली आहे.

आरोपींची चुप्पी कायम
दरम्यान, अटक दोघांना न्यायालयाने सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दोघांना पोलिसी खाक्या दाखवला तरी त्यांनी अद्याप मुद्देमालाबाबत तोंंड उघडलेले नाही. आता या टोळीकडून सोने खरेदी करणारेही पोलिसांच्या रडावर आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !