धक्कादायक ! : मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी जळगावात अपक्ष उमेदवाराने स्वतःच्या घरावर केला गोळीबार : त्रिकुटाला बेड्या

तिघा आरोपींना अटक, पाच आरोपींविरोधात गुन्हा ः पोलिसांना सुरुवातीपासून संशय


जळगाव (5 डिसेंबर 2024) : जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली होती. विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत झालेल्या गोळीबाराने खहबळ उडाली होती मात्र मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार करवून घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून उघड झाली आहे.

असे आहे प्रकरण
अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेनयांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आपल्या सहकार्‍यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक बाजूने तपास केल्यानंतर अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी आपला भाचा, मुलगा शालक आणि त्याच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या घरावर गोळीबार करण्याचे षड्यंत्र रचले.

पोलिसांना सुरूवातीपासून गोळीबारावर संशय
सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकारात पोलिसांना कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय होता शेवटी खबर्‍यांचे नेटवर्क मधून माहिती मिळाली की अपक्ष उमेदवारानेच हे सगळे शतयंत्र आपल्या चालकाच्या सोबत मिळून रचले आहे. याप्रकरणी पोलिसांनी इरफान अहमद मोहम्मद हुसेन, शेख अहमद शेख हुसेन, शेख शिबान फाईज अहमद हुसेन, मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तीन आरोपींना अटक : दोघे पसार
गोळीबार करणारा मोहम्मद शफीक उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हे दोघे पसार असून इतर आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

दोघा पसार आरोपींचा शोध सुरू
गोळीबार झाल्यापासून संपूर्ण प्रकरण संशयास्पद होते. तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाला आहे. गोळीबार करून लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !