तीन लाखांचे लाच प्रकरण : जळगावातील आरटीओ दीपक पाटील यांना 21 पर्यंत अंतरीम जामीन


Three lakh bribe case: Jalgaon RTO Deepak Patil granted interim bail till 21 जळगाव (8 डिसेंबर 2024) : नवापूर चेक पोस्टवर नोव्हेंबर महिन्यात नियुक्ती केल्याच्या मोबदल्यात खाजगी पंटराच्या माध्यमातून तीन लाखांची लाच घेताना जळगावातील प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व त्यांचा खासगी पीए भिकन भावे यांना गुरुवार, 5 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीने पकडले होते मात्र दीपक पाटील यांच्या छातीत दुखू लागताच त्यांना सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले होते. शनिवारी जळगाव एसीबीने दोघांना न्यायालयात हजर केले असता आरटीओ दीपक पाटील यांच्या मातोश्री मंदाकिनी अण्णा पाटील (एरंडोली, जि.सोलापूर) यांचे निधन झाल्याने न्यायालयात शपथपथ दाखल केल्यानंतर पाटील यांना 21 पर्यंत अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायालयात दाखल केले शपथपत्र
न्यायालयाने दोघा संशयीतांना कोठडी सुनावल्यानंतर आरटीओ पाटील यांच्या आई मंदाकिनी अण्णा पाटील यांचे निधन झाल्याची माहिती फोनवर प्राप्त झाल्यानंतर न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आल्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दीपक पाटील यांना न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत 21 पर्यंत जामीन मंजूर केला. दीपक पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड.गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !