इथे न्याय ओशाळला : पाच लाखांची लाच मागणार्या सातार्यातील न्यायाधीशासह चौघांविरोधात गुन्हा
Justice has been perverted here: Case registered against four people including a judge from Satara who demanded a bribe of five lakhs सातारा (11 डिसेंबर 2024) : जामीन प्रकरणात पाच लाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सातार्यातील न्यायाधीशांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
पुण्यातील 24 वर्षीय तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. हा प्रकार 3, 9 तसेच 10 डिसेंबर रोजी घडला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तक्रादार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले. तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करुन देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली.
10 डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

