रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : नॉन इंटरलॉकिंग कामामुळे बुधवारी सात रेल्वे गाड्या रद्द
दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट : नागपूर विभागातील सिंदी स्थानकावर होणार कामे
Railway passengers, pay attention: Seven trains cancelled on Wednesday due to non-interlocking work भुसावळ (16 डिसेंबर 2024) : नागपूर विभागामध्ये सिंदी स्थानक आणि यार्डमध्ये महत्त्वाची कामे केली जाणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहे. बुधवार, 18 रोजी ब्लॉक घेतला जाणार आहे. नागपूर-वर्धा विभागातील तिसरी आणि चौथ्या लाईनसह लाँग हॉल, लूप लाईनीसाठी महत्त्वाच्या पायाभूत कामांसाठी नॉन इंटरलॉकिंग कामे करण्यात येणार आहते. नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.
प्रवाशांची होणार गैरसोय
नागपूर विभागातील सिंदी रेल्वे स्थानकासह यार्डात होत असलेल्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला असून बुधवारी नागपूरकडे जाणार्या सात मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या मार्गावर जाणार्या प्रवाशांची या ब्लॉकमुळे 18 रोजी गैरसोय होणार आहे.
बुधवारी या गाड्या होणार रद्द
बुधवारी नागपूरातील ब्लॉकमुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये अमरावती-वर्धा मेमू, वर्धा-अमरावती मेमू, भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस, वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस, अमरावती-अजनी एक्स्प्रेस, अजनी-अमरावती एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट
11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 18 रोजी वर्धा स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ही गाडी वर्धा ते गोंदिया दरम्यान रद्द असेल तसेच 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 18 रोजी वर्धा स्टेशन येथून नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी गोंदिया ते वर्धा दरम्यान रद्द राहील. प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.