तळीरामांना पर्वणी : 31 डिसेंबरच्या पहाटे पाचपर्यंत दारू मिळणार !


Taliram’s celebration: Liquor will be available till 5 am on December 31st! मुंबई (25 डिसेंबर 2024) :  ही बातमी खास नववर्षाचे स्वागत करणार्‍या तळीरामांसाठी आहे. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आतापासूनच तयारी केली आहे तर तळी रामांनी मद्याचा स्टॉकही करण्याचे नियोजन केले आहे मात्र सरकारने तळीरामांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 31 डिसेंबर रोजी सेलिब्रेशन होत असताना पहाटे पाच वाजेपर्यंत दारू विक्री सुरू राहणार आहे तर बियर बार आणि पाब हे उघडे राहतील. असे असलेतरी कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

सरकारकडून परिपत्रक जारी
गृह विभागाच्या आदेशानुसार, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस दारू दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली. सरकारी परवान्यानुसार दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.



दारूची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील. तर परमीट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील. रात्री साडेदहा वाजता राज्यभरात दारूची दुकाने बंद होतात. पण ख्रिसमस आणि वर्षाअखेरीस मद्यविक्रीची वेळ वाढवण्यात आल्याने तळीरामांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे .

 











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !