तीन हजारांची लाच मागणी भोवली : पिंप्रीहाट तलाठ्यासह दोघांविरोधात गुन्हा
भडगाव (25 डिसेंबर 2024) : हक्कसोड पत्राची नोंद करण्यासह सातबारा उतारा देण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागणार्या भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट तलाठ्यासह खाजगी पंटराविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत मात्र पसार झाले असून एसीबीने त्यांचा शोध सुरू केला आहे. तलाठी विलास बाबुराव शेळके व खाजगी पंटर धीरज असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांचे नाव आहे
असे आहे लाच प्रकरण
कोळगाव येथील 49 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांची भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे. जनिीत बहिणीच्या हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व 7/12 उत्तारे देण्याच्या मोबदल्यात आरोपी तलाठी शेळके व पंटर धीरज यांनी सुरूवातीला चार हजार रुपये लाच मागून तीन हजार रुपये स्वीकारण्याचे 4 डिसेंबर 2024 रोजी मान्य केले मात्र संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव उपअधीक्षक योगेश ठाकूर, दिनेशसिंग पाटील, शैला धनगर, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.