मैदानी स्पर्धेमुळे मानसिक, शारीरिक आरोग्य स्वास्थ्य राहण्यास मदत : राजेश सुराणा
भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
भुसावळ (27 डिसेंबर 2024) : मोबाईल वापरामुळे शारीरिक तसेच मानसिक नुकसान होत असल्याने विद्यार्थिनींनी मोबाईलचा वापर टाळावा. ज्या विद्यार्थिनींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल अशा विद्यार्थिनी शिक्षण क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेताना दिसून येतात त्यामुळे तुम्हीदेखील महाविद्यालयाचे नाव प्रगती शिखरावर जोडावे, असे आवाहन श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य राजेश सुराणा यांनी केले. शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलन ‘उमंग 2024-25’ मैदानी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल यांनी मैदानी खेळाचे महत्व सांगितले. प्रास्ताविक समिती प्रमुख निलेश गुरचल यांनी महाविद्यालयातील विविध स्पर्धा व त्यांची माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालतील उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.अर्चना झिंगरन, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.के. सी. सूर्यवंशी, प्रा.श्वेता नागला, क्रीडा स्पर्धा समिती प्रमुख प्रा.निलेश गुरूचल, स्नेहसंमेलन सचिव ज्योती प्रभाकर सावकारे, जास्मीन राजू तडवी, आदी उपस्थित होते. धावण्याच्या शर्यती, गोळा फेक, भालाफेक, कॅरम यांसारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

यांनी पटकावला क्रमांक
कॅरम स्पर्धेमध्ये प्रथम- खुशबू विकास चौधरी, द्वितीय पूर्वा चंद्रकांत कोल्हे, बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम- डिंपल संजय तायडे तर द्वितीय हर्षा संजय तायडे, गोळा फेकमध्ये प्रथम सुनीता विजय कमलाकर, द्वितीय- कविता काळूराम बारेला, थाली फेक प्रथम- भाग्यश्री राजेंद्र महाजन, द्वितीय- कोमल रामचंद्र चौधरी, भालाफेक स्पर्धेमध्ये प्रथम कांचन रवींद्र पाटील, द्वितीय कोमल रामचंद्र चौधरी, 100 मीटर धावण्यात प्रथम कविता काळूराम बारेला, द्वितीय हर्षाली विकास पाटील आली. सूत्रसंचालन प्रा.आर.एच.पाटील यांनी तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.अर्चना झिंगरन यांनी मानले. महाविद्यालयातील प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा.विनोद भालेराव, प्रा.पंकज फालक, प्रा.रवीकांत वासनिक, प्रा.किरण खेट्टे, प्रा.श्यामकांत बाविस्कर, प्रा.जाकीर शेख, प्रा.करण भालेराव, प्रा.गिरीश सरोदे, माजी विद्यार्थिनी मेघा टेंभुर्णीकर इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.









