बोरखेडा हत्याकांड : 9 जानेवारी रोजी भुसावळ सत्र न्यायालयात कामकाज
Borkheda massacre : Proceedings in Bhusawal sessions court on January 9 भुसावळ (27 डिसेंबर 2024) : राज्यभरात गाजलेल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणाची सुनावणी आता 9 जानेवारी रोजी होणार आहे. या खटल्याचे कामकाज गुरूवारी येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात चालले. या खटल्यात 30 जणांनी साक्ष नोंदवली असून आता निकालाकडे लक्ष लागले आहे.
30 जणांची नोंदवली साक्ष
बोरखेडा येथील बालकांच्या हत्याकांडाचा खटल्याचे कामकाज येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात यात घटनास्थळ पंच, नकाशा तयार करणारे पंच, वैद्यकीय अधिकारी, पिडीताचे वडील, नाशिक प्रयोग शाळेतील एफएसएल तज्ञ, मुद्देमाल वाहक, नोडल अधिकारी, पोलिस निरीक्षक, डीवायएसपी असे एकुण आतापर्यत 30 जणांच्या साक्षी, पुरावे नोंद करण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या खटल्यात पुरावा बंद करण्याचा अर्ज न्यायालयास दिला. संशयीतातर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी काम पाहिले.










