भुसावळातील श्याम अग्रवालचे सीए परीक्षेत घवघवीत यश
भुसावळ (27 डिसेंबर 2024) : शहरातील रहिवासी श्याम सतीश अग्रवाल हा तरुण सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. शहरातील पूजा लॅमिनेशन व पूजा अॅडव्हर्टाजसर्च संचालक नंदलालजी बन्सीलालजी अग्रवाल यांचे लहान बंधू सतीशजी बन्सीलालजी अग्रवाल यांचा तो सुपूत्र आहे.
परिस्थितीवर मात करीत मिळवले यश
भुसावळातील अग्रवाल कुटूंबियातील श्याम अग्रवाल या तरुणाने अत्यंत काठीण्य पातळीवरील सीए परीक्षेत यश मिळवले आहे शिवाय तो फर्स्ट क्लास श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या गुरूजणांना तसेच संपूर्ण परिवाराला दिले आहे. या यशाबद्दल शहरातील अग्रवाल समाजबांधवांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.










