डंपर दुचाकीला धडकल्याने रेवतीच्या तरुणाचा मृत्यू


Revathi youth dies after dumper hits bike बोदवड (29 डिसेंबर 2024) : भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर अपघातानंतर डंपर कलंडले. हा अपघात येवती-रेवती रस्त्यावर शनिवारी दुपारी 12.15 वाजता घडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.

डंपरची दुचाकीला धडक
शेलवड येथून भरधाव येणार्‍या डंपरने (एम.एच.19 सी.वाय.6428) ने जामठीवरून रेवतीकडे जाणार्‍या दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील विकास सुभाष साळवे (22) आणि दीपक देविदास शेजोळे (20, दोन्ही रा.रेवती) हे जखमी झाले तर विकास साळवेचा जागीच मृत्यू झाला तर दीपक शेजोळे गंभीर जखमी झाला.

विकास आणि दीपक हे दोघे शनिवारी जामठी येथे आठवडे बाजाराची मजुरी घेण्यासाठी आले होते. तेथे पैसे घेऊन परत गावी रेवतीला जाताना जामठीपासून तीन किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठले. डंपर चालक विकास प्रकाश बावस्कर (रा.मुक्तळ ता.बोदवड) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !