खुनासह विविध गुन्हे दाखल असलेला यावलचा संशयीत एक वर्षांसाठी हद्दपार
Yaval suspect, facing various crimes including murder, deported for one year यावल (6 जानेवारी 2025) : शहरातील रेणुका माता मंदिर परिसरातील 35 वर्षीय तरुणावर खुनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास एका वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश फैजपूर उपविभागीय प्रांत अधिकार्यांनी जाहीर केल्यानंतर यावल पोलिसांनी शनिवारी तरुणाला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सोडले आहे.
यावल पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
यावल पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपींवर हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. यात यावल शहरातील रेणुका माता मंदिराजवळील रहिवासी देवानंद बाळू कोळी-सपकाळे (35) या तरुणावर खुनासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्ह्यात संशयीत असून तो सध्या जामिनावर मुक्त आहे. यावलचे पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर, हवालदार वासुदेव मराठे यांनी त्याच्यासंदर्भात हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होत. व त्याला फैतपूर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी बबन काकडे यांनी मान्यता दिली.



