अंजाळे येथे तापी प्रिस्टेस्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चोरी


यावल (10 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील तापी प्रिस्टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून विविध प्रकारचे साहित्य लांबवण्यात आले. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 58 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अंजाळे गावाजवळ जयंत फकीरचंद कोठारी यांची तापी प्रिस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तेथे असलेले साहित्य चोरी केले. विविध प्रकारचे साहित्य येथून चोरी झाले आहेत. तब्बल 58 हजार 200 चे साहित्य येथून चोरी झाल्याप्रकरणी यावल पोलिसांनी जयंत कोठारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.


कॉपी करू नका.