यावल शहरात 35 वर्षीय तरुणास अश्लील शिवीगाळ


यावल (22 फेब्रुवारी 2025) : शहरातील देशपांडे गल्लीच्या कॉर्नरवर म्हसोबा मंदिराजवळ 35 वर्षीय तरुणाला मध्यप्रदेशातील एकाने अश्लील शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल शहरातील देशपांडे गल्लीच्या वळणावरील म्हसोबा मंदिराच्या समोर दीपक अरुण मंदवाडे (35) हा तरुण उभा असताना तेथे गणेश तुळशीराम चौधरी (भारत मैदान, फवारा चौक, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) आला व त्याने अश्लील शिवीगाळ केली व ठार मारून टाकण्याची धमकी दिली. संबंधित विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून त्याने मंदवाडे यांना ठार मारून टाकेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गणेश चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !