धुळे शहरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर गुन्हे शाखेची कारवाई

तीन महिलांची सुटका : महिलेसह दोघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल


धुळे (22 फेब्रुवारी 2025) : शहरातील देवपूर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका घरात अवैधरित्या महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच निर्देश दिल्यानंतर शुक्रावर, 21 रोजी पथकाने छापेमारी करीत तीन महिलांची सुटका केली. याप्रकरणी अवैध व्यवसाय चालवणार्‍या महिलेसह गौरव लोटन महाजन (24, वरखेडी, जि.धुळे) व सौरभ राजेंद्र देवरे (24, रा.वरखेडी, जि.धुळे) यांच्याविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात पीटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

अवैध वेश्या व्यवसायावर कारवाईने खळबळ
आरोपी महिलेने उच्चभू्र सोसायटीत चार महिन्यांपूर्वीच भाडे तत्वावर खोली घेतली होती व महिलांकरवी अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच शुक्रवारी छापा मारून कारवाई करण्यात आली. यावेळी दोन तरुण अश्लील चाळे महिलांसोबत करताना पकडण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, हवालदार मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, शीला सूर्यवंशी, कॉन्स्टेबल राजीव गीते, गुलाब पाटील, भरोसा सेल येथील महिला उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे, मोनाली सैंदाणे यांच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !