वाघोडमध्ये खळबळ : स्वत:च्या गळ्यावर विळ्याने वार करून वृद्धाची आत्महत्या


रावेर (23 फेबु्रवारी 2025) : स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करीत 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाघोड येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय घडले नेमके ?
ावेर तालुक्यातील वाघोड येथील रहिवासी चिंतामण फकीरा कुंभार (65) यांनी शुक्रवार, 21 रोजीच्या पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान स्वतः च्या गळ्यावर स्वतः च्या हाताने विळ्याने वार केला. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, जळगाव येथे हलवण्यात आले मात्र अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषीत केले . याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नितीन आमोदकर
करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !