भालोद ते हिंगोणा रस्त्यावर पिकअप वाहन उलटले : 15 जण जखमी

यावल (23 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील भालोद ते हिंगोणा जाणार्या रस्त्यावर मध्यप्रदेशातून भालोदकडे येत असलेले पिकअप वाहन उलटले. या अपघातात 15 जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. जखमी अवस्थेतील सर्वांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व येथे प्रथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कसा झाला अपघात ?
भालोद, ता.यावल या गावापासून हिंगोणा जाणार्या रस्त्यावर मध्य प्रदेशातून पिकअप घेऊन घेवून चालक जात असताना वळणावर चालकाकडून नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. या अपघातात वाहन रस्त्यावरच उलटले. यात कविता थापा बारेला (17), थापा बारेला (40), सुमीता बारेला (40), दिलीप भाजा बारेला (16), सखाराम बारीला (20), नीर्जा बारेला (25), संदीप बारेला (7), ममता मांगीलाल बारेला (8), आनंद सखाराम बारेला (5 महिने), मंगू जगदीश बारेला (34), उमेश जगदीश बारीला (10), शारदा मांगीलाल बारेला (10), दीपाली जगदीश बारेला (8), जगदीश बारीला (30), भग्या बारेला (40) जखमी झाले.
सर्व जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये हिंगोणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, यावल रुग्णालयाचे डॉ.हर्ष पटेल, डॉ.इरफान खान, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, संजय जधे, मनोज भोईटे या सर्वांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. यातील काहींना जबर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यासह सर्वांनाच जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
