भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार नंदलाल अग्रवाल यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा

भुसावळ (23 फेब्रुवारी2025) : शहरातील ज्येष्ठ पत्रकार व चिंतामणी विहारातील रहिवासी नंदलाल बन्सीलाल अग्रवाल (78) यांचे रविवार, 23 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, 24 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते पूजा अॅड एजन्सीचे संचालक विशाल अग्रवाल व विवेक अग्रवाल यांचे वडील तर सतीश अग्रवाल यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.




