भुसावळ बसस्थानक परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास रास्ता रोको : मनसेचा इशारा


भुसावळ (3 जून 2026) : भुसावळ बस-स्थानकाच्या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. आगामी पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होणार असून या संदर्भात दखल न घेतल्यास रााता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

डांबरीकरणासाठी आंदोलनाचा इशारा
भुसावळ बस-स्थानकाच्या परिसरातील रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी खडी टाकून काम सुरू करण्यात आले होते मात्र त्यानंतर हे काम अर्धवट सोडण्यात आले व रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही झालेले नाही. एस.टी.आगार प्रशासनाला 1 एप्रिल 2026 रोजी भुसावळ बस-स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आले मात्र त्यावेळी काँक्रिटीकरण शक्य नसल्याचे व डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले मात्र दोन महिन्यांचा कालावधी होवूनही डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. मागणीची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनानंतरच्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार एस.टी.प्रशासन, असेल असा इशाराही देण्यात आला. निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका सचिव विलास कोळी, सुशील मोरे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !