जळगावात अल्पवयीन बालकाच्या कारने नऊ जणांना उडवले


जळगाव (4 जून 2026) : अल्पवयीन बालकाने भरधाव वेगाने काम दामटल्यानंतर नियंत्रण सुटताच या कारच्या धडकेने नऊ जण जखमी झाले. नियंत्रण सुटलेली कारची स्त्यावरील अनेक नागरिकांना धडक बसली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरील तब्बल 9 जणांना धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला.

अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच एका इलेक्ट्रिक दुचाकीस्वारालाही कारची जोरदार धडक बसल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. संतप्त नागरिकांच्या रोषाची भीती वाटल्याने अल्पवयीन चालक कार घटनास्थळीच सोडून पसार झाल्याचे सांगण्यात आले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !