मुक्ताईनगरात उमराहसाठी जाणार्या भाविकांचे स्वागत

मुक्ताईनगर (24 फेब्रुवारी 2025) : मुक्ताईनगर शहरातील सीड फार्ममधील रहेनुमा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयतर्फे शहरातून इस्लाम धर्मांमधील पवित्र ठिकाण मक्का मदीना येथे उमराहासाठी जाणार्या चार भाविकांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयाचे अध्यक्ष हकीम चौधरी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे सचिव कलीम मणियार, खजिनदार अहमद ठेकेदार, राष्ट्रीय मराठा वस्तीगृहाचे सचिव शिवश्री दिनेश कदम, डॉ.दिलीप भास्कर तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हज यात्रा व उमराहा बाबत थोडक्यात माहिती वाचनालयाचे अध्यक्ष हकीम चौधरी यांनी दिली. हज हे प्रत्येक श्रीमंत माणसाचे कर्तव्य असून त्यांनी कमीत-कमीत आयुष्यातून एकदा तरी हज या पवित्र यात्रेला जावे, असे ते म्हणाले. रहेनुमा सार्वजनिक वाचनालय ग्रंथालयाचे सह सचिव अब्दुल रफिक मजीद मणियार व त्यांची पत्नी शकीला बी शेख रफिक, तसेच हुसैन कुरैशी, मोहम्मद शेख (मापारी) अशा उमराहला जाणार्या भाविकांचा सत्कार प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमास हारून मेंबर, समद ठेकेदार, दिनेश कदम, डॉ.दिलीप तायडे, मणियार मस्जिदचे मौलाना मुबशीर अहमद, हाजी लाल खा ब्रोकर उपस्थित होते. यशस्वीसाठी रिजवान चौधरी यांनी प्रयत्न केले. आभार शेख कलीम मणियार यांनी मानले.
