शरद पवारांनी साधला निशाणा : नीलम गोर्‍हे यांचे विधान मूर्खपणाचे !


मुंबई (24 फेब्रुवारी 2025) : नीलम गोर्‍हे यांचे विधान मूर्खपणाचे होते यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता नाही, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोर्‍हे या गोष्टींबाबत तिथे भाष्य करायला नको होतं असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी जे सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोर्‍हे यांनी या संबंधीचे भाष्य करायची आवश्यकता नव्हती. या अधिवेशनात सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजेत. त्यांनी तिथे गाडीचा उल्लेख केला. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांच्या चार टर्म झाल्या आहेत. या सगळ्या चार टर्म कशा मिळाल्या आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा एकंदर तिथला सहभाग याची फारशी चर्चा न केलेली बरी. कारण त्यांची महाराष्ट्राच्या विधिमंडळात जी एन्ट्री झाली ती प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली. तो कालावधी संपल्यानंतर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. हल्ली असं दिसतंय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये त्या आहेत. म्हणजे एका मर्यातीत काळामध्ये सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं, असं शरद पवार म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !