काळापाणी येथे तरुणाचा खून : नऊ आरोपींना अटक


शिरपूर (24 फेब्रुवारी 2025) : मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला गावातील काहींनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवल्यानंतर संशयीतांनी मृतदेह नाल्यात फेकला होता. या प्रकारानंतर संतप्त जमावाने संशयीत आरोपींच्या घराला पेटवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील कालापाणी येथे 19 फेब्रुवारी रोजी घडली होती. कमलसिंग उदयसिंग वसावे (20) या तरुणाच्या खून प्रकरणी सुरूवातील दोन संशयीतांना अटक केल्यानंतर नव्याने नऊ आरोपींना अटक करण्यात आली.

मारहाणीत तरुणाचा मृत्यू
उमर्दा गावातील ओंकार रायमल पावरा (18) या तरुणाच्या तक्रारीनुसार, मैत्रिणींना भेटण्यासाठी ओंकारसोबत कमलसिंग दारासिंग वसावे, मंगेश उदयसिंग पावरा, कमलसिंग उदयसिंग पावरा असे चौघे मध्यरात्री कालापाणी येथे गेल्यानंतर संशयीत सुरलाल मसान्या पावरा, बाज्या ऊर्फ बाजीराव दुध्या पावरा, भिका ऊर्फ भुरलाल दुध्या पावरा, रिंगण्या दुधा पावरा, राज्या ऊर्फ राजेश दुधा पावरा, खातरसिंग रेल्या पावरा, मिथुन कैलास पावरा यांनी अडवत लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत चौघांनाही डांबून ठेवले. यात कमलसिंग जखमी होवून पहाटे मृत झाला व नंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देत अन्य मित्रांना हाकलून दिले. यानंतर संतप्त उर्मदा गावातील लोकांनी आरोपींच्या घरासह शेजारील घरांची तोडफोड केली तसेच महिलांसह इतर वयस्कांना मारहाण करीत त्यांच्या अंगावरील दाणदागिन्यांसह पैशांची लूटमार केली होती. मयत तरुणाच्या मृतदेहावर संशयीताच्या घरासमोर अंत्यसंस्कारही करण्यात आल्यानंतर 23 रोजी शिरपूर तालुका पोलिसात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

आतापर्यंत 11 आरोपींना अटक
तरुणाच्या खून प्रकरणी सुरूवातीला दोन आरोपींना अटक केल्यानंत नव्याने नऊ आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वसावे, मनोज कचरे, संतोष पाटील, संदीप ठाकरे, शेखर बागुल, योगेश मोरे, संजय भोई, कृष्णा पावरा, स्वप्नील बांगर, सुनील पवार, भूषण पाटील, दिनकर पवार, धनराज गोपाळ, ईसरार फारुकी, मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !