धुळ्यात 35 हजारांच्या गुंगीकारक औषधांसह तिघांना बेड्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : शिरपूरातील प्रथितयश संस्थेतील क्लार्ककडून गुंगीकारक औषधांची विक्री


धुळे (24 फेब्रुवारी 2025) :मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणार्‍या गुंगीकारक औषाधांची धुळ्यातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थाजवळ विक्री होणार असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचत दोघांना अटक केली. कल्पेश गोकुळ जगदाळे (20) व अजय श्रावण कोळी (20, दोन्ही रा.खर्दे बु.॥, ता.शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून 35 हजार 832 रुपयांचा औषधी साठा व 90 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, संशयीतांच्या चौकशीत त्यांनी औषधांचा साठा अर्थे, ता.शिरपूर येथील एका नामांकीत संस्थेतील क्लर्क महेश ईशी याच्याकडून घेतल्याची कबुली देताच या संशयीतालाही अटक करण्यात आली.

क्लर्कच निघाला आरोपी
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयीत दुचाकी (एम.एच.18 बी.वाय.9604) वर आल्यानंतर त्यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याकडील बॉक्समध्ये गुंगी येणार्‍या टॅबलेटसह सायरप आढळल्यने ते जप्त करण्यात आले. दरम्यान, संशयीतांच्या चौकशीत त्यांनी हा साठा अर्थे, ता.शिरपूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालयातील क्लर्क महेश ईशीकडून घेतल्याचे सांगितल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली. संशयीत महेश बी.फार्म झाला असून गेल्या काही वर्षांपासून तो हा उद्योग करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक अमित माळी, औषध निरीक्षक किशोर देशमुख, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, हेमंत पाटील आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !