भुसावळातील हिंदी महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव


भुसावळ (25 फेब्रुवारी 2025) : शहरातील हिंदी महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविधान गौरव महोत्सव हा उपक्रम महिनाभर साजरा करण्यात आला. डॉ.प्राचार्य रमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोस्टर्स स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच राजनीति विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर शर्मा यांचे व्याख्यान झाले.

आपले मौलिक अधिकार काय आहे व लोकतंत्र्यांच्या नियमांचे पालन केले पाहिजे तसेच संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना यावेळी पटवून देण्यात आले. पंतप्रधान कौशल्य विकास रोजगार केंद्रातर्फे ऑनलाईन जॉब पोर्टलच्या माध्यमातून ‘रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना योगेश धीमान यांनी ‘रोजगाराच्या संधी’ कशा प्राप्त कराव्या याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही करण्यात आले. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानातील योगदान, सामाजिक समता, व लोकशाही राष्ट्रासाठी कसे उपयुक्त आहे याविषयी आपले विचार व्यक्त केले. प्रा.अनुपम शर्मा यांनी संविधानाची गौरवशाली परंपरा व इतिहास याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा.अनुपम शर्मा व प्रा.ज्योती ओस्तवाल यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यशस्वीतेसाठी डॉ.विवेक जोशी, डॉ.सुधीर शर्मा, प्रा.शिबा खान, प्रा.समता तायडे आदी सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !