भुसावळात उद्या महाशिवरात्रीनिमित्त नुपूर महोत्सव


भुसावळ (25 फेब्रुवारी 2025) ; शहरातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या वतीने यंदाही महाशिवरात्रीनिमित्त शहरात नुपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 26 रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील डॉ.बी.व्ही. खाचणे हॉल येथे होणार्‍या कार्यक्रमात नुपूर अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी आपल्या नृत्यशिक्षिकांसह कथक नृत्य तर कोलकाता येथील पाहुणे कलाकार श्रीहरी मुजुमदार हे कथकली नृत्य सादर करतील.

यंदा या महोत्सवाचे 28 वे वर्ष असून सर्व रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान या महोत्सवात दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर शास्त्रीय नृत्याचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या कलावंतास नृत्यश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षी हा पुरस्कार मुजुमदार यांना घोषित करण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !