राज्यातील सात जिल्हाधिकार्यांच्या बदल्या : जाणून घ्या नेमकी बातमी

मुंबई (25 फेब्रुवारी 2025) : राज्यातील सात आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेंद्र निंबाळकर यांची सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेंद्र भारुड यांची रुसाच्या प्रकल्प संचालकपदावर बदली करण्यात आली आहे.
- अशा झाल्या बदल्या
- राजेंद्र निंबाळकर : व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- संजय यादव : जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र भारुड : आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, RUS, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- दीपक कुमार मीना : अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- समीर कुर्तकोटी : यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- महेश आव्हाड : व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- कीर्ती किरण पुजार : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
