शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई : धुळ्याकडे येणाऱ्या पाच लाखांच्या अवैध दारूसह आयशर जप्त


शिरपूर (25 फेब्रुवारी 2025) : मध्यप्रदेशातून कर चुकवून अवैधरित्या विदेशी दारूची धुळ्याकडे वाहतूक होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. हाडाखेडा चेक पोस्टवर आयशर वाहन आल्यानंतर पथकाने वाहन अडवले असता वाहन चालक रस्त्यात वाहन उभे करून पसार झाला. या वाहनात चार लाख 80 हजार रुपये किंमतीची अवैध विदेशी दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मध्यप्रदेशातील सेंधवाकडून धुळ्याकडे आयशर वाहन (क्रमांक एच.आर.38 एए 2423) मध्ये अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळताच त्यांनी पथकाला निर्देश दिले.
हाडाखेड चेक पोस्ट जवळ मुंबई-आग्रा रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आल्यानंतर संशयीत वाहन येताच चालकाने पथक पाहून धूम ठोकली. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात चार लाख 80 हजा रुपये किंमतीची व्हाईट अ‍ॅन्ड ब्ल्यु कंपनीची व्हिस्की विदेशी दारु आढळल्याने ती जप्त करण्यात आली तसेच दहा लाखांचा आशयर ट्रक जप्त करण्यात आला. धनराज गोपाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, हवालदार संतोष पाटील, राजु दिसले, संजय भोई, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, धनराज गोपाळ, जयेश मोरे, मनोज नेरकर, चालक फारुकी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !