इलेक्ट्रीक मोटारींची चोरी : दोघा भामट्यांना धुळे तालुका पोलिसांकडून बेड्या

चोरीच्या पाच इलेक्ट्रीक मोटार जप्त : कारवाईने शेतकर्‍यांमध्ये समाधान


धुळे (25 फेब्रुवारी 2025) : शेतकर्‍यांच्या शेतातील इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणार्‍या चोरट्यासह चोरीचा मुद्देमाल खरेदी करणार्‍या संशयीताला धुळे तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुनील भगवान भोई (28, शिरुड, ता.जि.धुळे) असे चोरट्याचे तर डिगंबर शेनपडू चव्हाण (44, शिरुड, ता.धुळे) चोरीच्या मोटारी खरेदी करणार्‍याचे नाव आहे.

पाच मोटारी जप्त
23 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास तक्रारदार सुजित दीपक पाटील ( शिरुड) यांच्या धामणगांव शिवारातील विहीरीतील पाण्याची मोटार चोरीला गेल्याने गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान ही चोरी सुनील भोई याने केल्याचे निष्पन्न होताच त्याच बोलते केल्यानंतर त्याने चोरीची कबुली देत मुद्देमाल डिगंबर चव्हाणला विकल्याचे सांगताच त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले. आरोपीने यापूर्वी खरेदी केलेल्या चार मोटारी काढून दिल्या. 44 हजार 500/-रुपये किंमतीच्या पाच मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. तपास हवालदार प्रकाश सोनवणे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार प्रकाश सोनवणे, हवालदार ललित खळगे, हवालदार मनोज शिरसाठ, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार उमेश पवार, विशाल पाटील यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !