चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई : गावठी कट्ट्यासह राहत्यातील आरोपीला बेड्या
दोन जिवंत काडतूसही जप्त : ः गोपनीय माहितीवरून कारवाई

Chalisgaon city police take major action: Accused residing with village gang arrested चाळीसगाव (26 फेब्रुवारी 2025) : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राहता येथील संशयीताला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह पकडले. ही कारवाई स्टेशन रोडकर मंगळवारी दुपारी करण्यात आली. किरण कैलास गायकवाड (21, मूळ रा.संक्सर ता.कोपरगाव, सध्या रा.शिर्डी बायपास, खंडोबा मंदिराजवळ ता.राहता) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार योगेश बेलदार, राकेश पाटील, अजय पाटील, नितीन आगोणे व निलेश पाटील हे मंगळवारी दुपारी चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना शहरातील स्टेशन रोडवरील हॉटेल विरामजवळ एक संशयीत गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह पथकाने धाव घेतली. संशयीत किरण गायकवाडची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळल्याने संशयीताला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणाकुमार कबाडी व पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व हवालदार राकेश पाटील करीत आहेत.
