जळगावात शतपावली करणार्या महिलेचे मंगळसूत्र धूम स्टाईल लांबवले

The mangalsutra of a woman performing Shatapawali in Jalgaon was lengthened in a dhoom style. जळगाव (26 फेब्रुवारी 2025) : धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी शतपावली करणार्या महिलेच्या गळ्यातून 60 हजारांचे मंगळसूत्र लांबवली. ही घटना हिरा पाईपरोडवरील मातृभूमी चौकात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
जळगाव शहरातील जुना नशिराबाद रोडवरील सदोबा नगरात शीतल दर्शन पाटील (32) या वास्तव्यास आहे. शनिवार, 22 रोजी रात्री त्या जेवण झाल्यानंतर घराजवळील हिरा पाईप रोड परिसरात शतपावली करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने शीतल दर्शन पाटील (32, रा.सदोबानगर, जूना नशिराबाद रोड) यांच्या गळ्यातून 60 हजारांचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले.
भामट्यांनी महिलेच्या गळ्यातून आठ ग्रॅम वजनाची 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढल्यानंतर सुमारे दीड ग्रॅम वजनाची मंगळसूत्रातील वाटी ही घटनास्थळी मिळून आली. एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
