भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

भुसावळ (26 फेब्रुवारी 2025) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मरणोत्तर नेत्रदान जनजागृती अभियान व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. नेत्रदान अभियान कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या सहकार्याने करण्यात आले.
मरणोत्तर नेत्रदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रा.निलेश गुरुचल यांनी नेत्रदानाचे महत्त्व नमूद केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग विद्यार्थिनींसमोर त्यांनी मांडले. उपस्थित सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेत्रदानचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून दिले. 25 रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय रक्तपेढी, जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास डॉ.एस.के.शेलार, डॉ.भावना पाटील, प्रा.जी.एन. पाटील, प्रा.ए.एन.वळवी (नगाव महाविद्यालय) यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी डॉ.मीना चौधरी, प्रा.निलेश गुरुचल, प्रा.गिरीश कोळी, प्रा.विनोद भालेराव, प्रा.पंकज फालक, प्रा.रवीकांत वासनिक, प्रा.संजय गावंडे, प्रा.पवन बेलबागकर, राजेंद्र पाटील, मनोज मंत्री यांनी सहकार्य केले.
