रावेरच्या तुषार सूर्यवंशीला अश्वमेध क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक


रावेर (26 फेब्रुवारी 2025) : शहरातील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील खेळाडू तुषार सूर्यवंशी याने अश्वमेध क्रीडा स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक पटकावले. चंद्रपूर येथील गोंडवाना विद्यापीठात झालेल्या अश्वमेघ क्रीडा आंतरविद्यापीठ स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या संघात रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचा खेळाडू तुषार सूर्यवंशी यांनी 800 मीटर रन या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले तर रिले या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळविले.

या यशाबद्दल खेळाडूचे संस्थाध्यक्ष हेमंत नाईक, संस्थेचे डॉप्रतीक नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, उपप्राचार्य व क्रीडा समन्वयक प्रा.एस.यु. पाटील, उपप्राचार्य प्रा.संदीप धापसे, डॉ.एस.आर.चौधरी, डॉ.ए.एन.सोनार, डॉ.एस.जी.चिंचोळे, डॉ.व्ही.बी.सूर्यवंशी, प्रा.व्ही.डी.पाटील, डॉ.एल.सी.नेमाडे, क्रीडा समिती सदस्य प्रा.चतुर गाडे, प्रा.नरेंद्र घुले, डॉ.बी.जी.मुख्यदल, प्रा.सत्यशील धनले, डॉ.संतोष गव्हाड, डॉ.निता जाधव, डॉ.स्वाती राजकुंदन, प्रा.सागर महाजन, कार्यालय व्यवस्थापक युवराज बिरपन आदींनी अभिनंदन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !