स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षक निलंबित


पुणे (26 फेब्रुवारी 2025) : बसच्या प्रतीक्षेत असलेल्या 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनराव यांना दिले आहेत शिवाय स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षक यांचे तत्काळ निलंबन केले आहे.

सुरक्षा रक्षक केले निलंबित
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे.

बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसर्‍या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असे निर्देश दिले आहेत. याबरोबरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील सा दिवसात आपणास सादर करावा, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !