वरणगावात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक गुन्हे शाखेकडून जप्त

भुसावळ (26 फेब्रुवारी 2025) : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक जळगाव गुन्हे शाखेने जप्त करीत संशयीत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवार, 25 रोजी करण्यात आली. वरणगाव शहरातील आस्वाद हॉटेलच्या पुढे फुलगाव फाट्याजवळील भुसावळ-मुक्ताईनगर नॅशनल हायवे पुलाखाली ट्रक (एम.एच.19 झेड. 4024) वरील चालक नामदेव बळीराम नन्नवरे (45, रा.गायवाडा बांभोरी, ता.धरणगाव) हा ट्रकमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले.
ट्रकमध्ये सहा हजार रुपये किंमतीची वाळू व चार लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. चालक नन्नवरे वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार प्रीतम पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
