विदर्भ, मराठवाड्यावर आजपासून अवकाळी पावसाचे संकट !

वादळासह गारपीट शक्य, शेतकर्‍यांना चिंता


जळगाव (20 मार्च 2025) : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चक्क वादळी वार्‍यांसह पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अमरावती आणि अकोला हे 2 जिल्हे वगळता विदर्भात 20 ते 22 मार्च दरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वाशिम आणि यवतमाळमध्ये 21 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट शक्य आहे. नागपूर, वर्धा भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

देशातील 12 राज्यांत पावसाचा अलर्ट
महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांमध्येही पावसाचा अलर्ट जारी झाला आहे. राजस्थानातील 12 जिल्ह्यांमध्ये, मध्य प्रदेशातील 13 जिल्ह्यांमध्ये, उत्तर प्रदेशातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात आज हिमस्खलनाचा इशारा जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !