भुसावळातील सत्ताधार्यांचा दुजाभाव : प्रभाग 14 मधील कामे डावलली : नगरसेविका सुभद्रा गुंजाळ यांचा दावा
भुसावळ (12 जुलै 2026) : भुसावळ पालिकेतील भाजपा सत्ताधार्यांच्या प्रभारीराज काळातील पहिलीच सर्वसाधारण सभा गुरुवार, 16 पालिका सभागृहात होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर 300 विषय असून त्यात विरोधकांच्या प्रभागातील डावलण्यात आल्याचा आरोप नगरसेविका सुभद्रा गुंजाळ यांनी केला आहे.
नगराध्यक्षांकडे विषय देवूनही ते डावलले
प्रभाग 14 मधील 29 कामांचे विषय 23 जून रोजी प्रभारी नगराध्यक्षांकडे दिले होते. यात प्रभागातील रिटेनिंग वॉल, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह, ओपन स्पेसवर पथदिवे बसवणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, उद्यान विकास आदी विषयांचा समावेश होता मात्र हे विषय डावलण्यात आल्याचे गुंजाळ यांनी कळवले आहे.

