भुसावळात महामार्गावरील लोखंडी अँगल लांबवणारे भामटे जाळ्यात
भुसावळ- महामार्ग चौपदरीकरणासाठी वापरण्यात आलेले कोटींग अँगल लांबवणार्या दोघा भामट्यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मनोज किसन भोई (28, फेकरी) व प्रवीण दिलीप ढोले (28, झेटीसी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी 22 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पंजाब खालसा हॉटेलसमोरून महामार्गाच्या कामासाठी वापरलेले 360 रुपये किंमतीचे सहा सपोर्टींग अँगल दुचाकीवरून लांबवले. याबाबत जयेश मुकुंदा साळी (भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, माणिक सपकाळे, वाल्मिक सोनवणे, रमण सुरळकर, नेव्हील बाटली, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, बंटी कापडणे आदींच्या पथकाने आरोपींना निंभोरा येथून अटक केली.