जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा : तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ !


Extension of the deadline for registration of tur purchase! जळगाव (28 मार्च 2025) : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत 2024-25 हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी 8 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव अशा एकूण 16 खरेदी केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख 8 एप्रिल 2025 आहे. तर खरेदीचा कालावधी 13 फेब्रुवारी 2025 ते 13 मे 2025 दरम्यान असणार आहे. तुर हमीभाव 7550 रुपये प्रति क्विंटल इतका आहे.





शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला 7/12 उतारा आणि 8 अ ही कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्र.जिल्हा पणन अधिकारी एस.एस.मेने यांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !