तळोदा तालुक्यात बालिकेचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद
आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू ः बिबट्यांचा मुक्त संचार

Leopard that killed a girl in Taloda taluka finally captured तळोदा (8 एप्रिल 2025) : तळोदा तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार असून आतापर्यंत वनविभागाने 14 बिबट्यांना जेरबंद केले असलेतरी बिबट्यांचे हल्ले थांबलेला नाहीत. सरदार नगरात 17 मार्च रोजी दीपमाला नरसिंग पाडवी या दहा वर्षीय बालिकेचा नरक्षभक बिबट्याने बळी घेतला होता व त्यानंतर मंगळवारी बिबट्याला जेरबंद करण्यात यंत्रणेला यश आले आहे.
तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये व शेतकर्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे नुकताच सरदार नगर येथे वन विभागाने भिका पाडवी यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्यात मंगळवार, 8 एप्रिल रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला यामुळे परिसरात अजून बिबटे मुक्त संचार करीत असल्याने नागरिक शेतकर्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
वन विभागाने आतापर्यंत 14 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले असले तरी मुक्त संचार करणार्या बिबट्यांची नेमकी संख्या किती ? हे अद्यापही कळालेले नाही. वनविभाग रात्र दिवस गस्त घालत असून या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यात प्रयत्न करित असताना अजून त्यांना पाहिजे तसे यश मिळालेले नाही. आत्तापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात आठ जणांच्या मृत्यू व दोन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणार्या हल्ल्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
वन विभाग बिबट्या ना जेरबंद करण्यात प्रयत्नशील असून यंत्रना कमी पडत आहे बिबट्यांच्या जेरबंदीसाठी यंत्रणा वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी नागरिक यांच्या मधून करण्यात येत आहे.
