भुसावळातील तरुणाचा मारहाणीत मृत्यू : दोन संशयीतांना अटक

बाजारपेठ पोलिसांसह गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी : अल्पवयीनही ताब्यात


Youth from Bhusawal Dies in Assault: Two Suspects Arrested भुसावळ (3 जून 2026) : जुन्या वादातून शहरातील व्हीआयपीसीटी कॉलनी भागातील मंगेश अंबादास काळे (26, भुसावळ) या तरुणाला मारहाण करण्यात आल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दोन संशयीतांना जळगाव गुन्हे शाखेसह बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे तर अन्य एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुंदन अनिल पठारे (19, वाल्मीक नगर, भुसावळ) व रोहित उर्फ दादू संजय नवगिरे (21, वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यांना न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
भुसावळच्या व्हीआयपीसीटी कॉलनी परिसरात मंगेश काळे (26) हा हातमजुरी करणारा तरुण पत्नी पायल (22) सह वास्तव्याला होता. 29 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास तो गच्चीवर झोपण्यासाठी गेल्यानंतर सहा संशयीत आले व कुंदन पठारे याने तु मातला असल्याचे सांगत लोखंडी रॉडने बेदम मारहाण सुरू केली तर अन्य संशयीतांनी हॉकी स्टीकसह लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी कुंदनने संशयीत मरेतून चॉपर काढल्यानंतर मारण्याचा प्रयत्न करताच त्यास अडवण्याच्या प्रयत्नात मंगेशच्या हाताला जखम झाली तर एका संशयीताने पिस्टल काढून धमकावले. यावेळी 112 वर कॉल केल्यानंतर पोलीस आल्यानंतर संशयीत पसार झाले. दरम्यान, फिर्यादी मंगेश हा मारहाणीत जखमी झाल्यानंतर त्यास जळगाव व तेथून मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सहा संशयीतांविरोधात आता खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार गोपाळ गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी राहुल वानखेडे, बाजारपेठ  हवालदार हवालदार विजय नेरकर, रमण सुरळकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, सोपान पाटील, योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, जितेंद्र विटकर, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !