वाघोद्याच्या युवकाचा निंभोर्यातील सुकी नदीत बुडाल्याने मृत्यू
निंभोरा : गावाजवळील सुकी नदीपात्रात बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मोहसीन मेहबूब तडवी (17, रा.मोठे वाघोदा, ता.रावेर) असे मयत युवकाचे नाव आहे. मोहसीन हा आपल्या भाऊ व मित्रांसह सुकी नदीवर पोहण्यासाठी आला होता. यावेळी तिघे मित्र खोल पात्रात बुडत असताना सख्खा भावासह मित्र कसे-बसे बाहेर आले मात्र मोहसीन खड्ड्यात पडल्याने बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गावात कळताच ग्रामस्थांनी नदीपात्राबाहेर मोठी गर्दी केली. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश जानकर व सहकार्यांनी धाव घेतली.