वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांचा हल्ला : नवापूर तालुक्यातील प्रकार

Timber smugglers attack a forest department team: Incident in Navapur taluka नवापूर (24 एप्रिल 2025) : अवैध लाकूड साठ्यावर कारवाईसाठी आलेल्या वनविभागाच्या पथकावर तस्करांनी हल्ला केला. ही घटना नवापूर तालुक्यातील वागदी गावात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
या हल्ल्यात आणखी दोन ते तीन वन कर्मचारी व अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वागदी येथे कारवाईसाठी वनविभागाचे पथक मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आल्यानंतर कारवाई होत असताना त्या ठिकाणी वन विभागाच्या पथकाला लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा, फर्निचर व मशिनरी जप्त करण्यात आली व त्याचवेळी पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला चढवला. त्यामुळे एकच धांदल उडाली.
एकाने कुर्हाडीने वार केल्याने वनपाल दीपक पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी राजू प्रभाकर वसावे या संशयितास ताब्यात घेतले. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांची कुमक मागवण्यात आली.
