नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Navneet Rana receives death threat again यवतमाळ (12 मे 2025 ) : हनुमान चालीसा वाचणारी हिंदू शेरनी थोड्याच दिवसांची मेहमान आहे, लवकरच उडवून टाकणार, अशी धमकी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकांवरून या प्रकारच्या धमकीचे संदेश सातत्याने येत असून राणा यांनी यासंबंधीची माहिती संबंधित पोलिस अधिकार्यांना दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांना ऑगस्ट 2023 मध्ये, अमरावतीतील एका व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्च 2025 मध्ये, नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गत वर्षी नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आले होते. यामध्ये आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख पत्रात असून नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली होती.
