शरद पवारांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार !

सुप्रिया सुळे केंद्रात राहणार असतील तरच राष्ट्रवादीचे विलीनीकरण : अजित पवार गटाचा सूर


Both NCP factions will come together as per Sharad Pawar’s orders! न्युज डेस्क । मुंबई (14 मे 2025) : राज्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या हल्ली चर्चा सुरू असून त्यामुळे अनेक मतप्रवाह व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचा शरद पवार गट अजित पवारांच्या गटात सामिल झाला तर महाविकास आघाडीत उद्धवसेना एकाकी पडण्याची चिन्हे आहेत. कारण काँग्रेसने उद्धव सेनेपासून अंतर राखणे सुरू केले आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची नुकतीच एक बैठक मंगळवारी रात्री झाली. त्यात सुप्रिया सुळे केंद्रीय राजकारणात सक्रिय राहणार असतील तरच अजित पवार गटात विलिनीकरण व्हावे, असा सूर व्यक्त करण्यात आला. थोडक्यात महाराष्ट्रात दोन सत्ता केंद्रे असू नयेत, असे पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी घेतलेली भूमिका योग्यच : पाटील
अजित पवार म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी जे काही निर्णय घेतील ते सर्व निर्णय आम्हाला मान्य असल्याचे रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या. प्रेमात आणि युद्धात जसे सगळे क्षम्य असते तसेच राजकारणातही असते. त्यामुळे शरद पवारांनीच एकत्र येण्याचे वक्तव्य केल्याने आता, त्या वेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका योग्यच होती हे सिद्ध झाले असल्याचेही रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

बुधवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक
शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये झपाट्याने घडामोडी बदलत आहे. मंगळवारी अजित पवारांच्या बंगल्यावरील बैठकीनंतर बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजीत केली जाणार आहे. ज्यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची सर्वाची उपस्थिती राहणार असून, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.

केंद्रात सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यास कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो. एकत्र आलेल्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचे नेतृत्व मान्य करून पुढची वाटचाल करायला हरकत नसल्याचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे. त्यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रात आणि राज्यातील राजकारण भक्कम होणार असल्याचेही ते म्हणाले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !